Wed, Nov 14, 2018 14:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता राज्यभरात भगवा फडकेल : आदित्य ठाकरे

आता राज्यभरात भगवा फडकेल : आदित्य ठाकरे

Published On: Dec 19 2017 9:21PM | Last Updated: Dec 19 2017 9:21PM

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी

इगतपुरीतील निकाल शिवसेनेसाठी ऐतिहासीक आहे. ही केवळ सुरुवात असून, शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. केवळ राजकारण नाही तर, समाजकारणाचा वसा शिवसेनेने घेतला आहे. ही सुरुवात असून, आगामी काळात राज्यभरात भगवा फडकेल. असे प्रतिपादन युवानेते आदित्य ठाकरे यांनी केले.

नाशिक दौर्‍यावर आलेल्‍या आदित्‍य ठाकरे यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुहास कांदे यांच्यासह पदाधिकारी उपस्‍थित होते. सायंकाळी शिर्डी येथून आदित्य ठाकरे यांचे नाशिक शहरात आगमन झाले. इगतपुरीतील नवनिर्वाचीत नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा सत्कार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर दिंडोरी  लोकसभा मतदारसंघ आणि नाशिक मतदारसंघ, शहर कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली.