Thu, Feb 21, 2019 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भावी पिढीने जिजाऊंची विचारधारा आत्मसात करावी’ 

‘भावी पिढीने जिजाऊंची विचारधारा आत्मसात करावी’ 

Published On: Jan 12 2018 3:02PM | Last Updated: Jan 12 2018 3:02PM

बुकमार्क करा
महाड : प्रतिनिधी

समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकामी छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी  केलेले मार्गदर्शन अनमोल आहे. त्यांच्या विचारधारा भावी पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमारी आदिती तटकरे यांनी  केले. पाचाड येथे झालेल्या जिजाऊंच्या ४२० वयाजयती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.  

रायगड जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाचाड स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राजमाता जिजाऊंच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या प्रसंगी उप स्थानिक ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या समोर तटकरे बोलत होत्‍या. 

तटकरे म्‍हणाल्‍या, ‘‘छत्रपती शिवराय यांच्यावर जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच त्यांचे पुढील स्वराज उभे राहिले.’’ शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वक्तृत्वा संदर्भात भाष्य करताना पुढील वर्षांपासून ही स्पर्धा जिल्हास्तरीय करण्याची त्यांनी यावेळी घोषणा केली.