Tue, Apr 23, 2019 22:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरतच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख सुरूच

घरतच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख सुरूच

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 1:40AMकल्याण : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत व त्याच्या दोन साथीदारांच्या जामीन अर्जावरील निर्णय कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा प्रलंबित ठेवला. त्यावर आता शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयातील सूत्रांनी दिली.

गत आठवड्यात बुधवारी 8 लाखांची लाच स्वीकारताना केडीएमसी अतिरिक्त आयुक्त संजय घरत, स्वीय सचिव ललित आमरे आणि वरिष्ठ लिपिक भूषण पाटील यांना ठाणे लाचलुचपत एसीबीने रंगेहात अटक केली होती. या सर्वांना गुरुवारी न्यायालयाने 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याचवेळी जामिनासाठी या तिघांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, वेळ नसल्याने कारण देत न्यायालयाने बुधवारप्रमाणे गुरुवारीही निकाल प्रलंबित ठेवला. त्यामुळे लाचखोर घरत व त्याच्या दोघा सहकार्‍यांना जामिनासाठी न्यायालयाकडून  तारीख पे तारीख मिळत असल्याने घरतचा मार्ग अधिकच खडतर बनत चालला आहे.