Sun, Jul 05, 2020 22:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदर्शप्रकरणी लवकरच पुढील निर्णय : भंडारी

आदर्शप्रकरणी लवकरच पुढील भूमिका : भंडारी

Published On: Dec 22 2017 6:03PM | Last Updated: Dec 22 2017 6:03PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

माजी मुख्यमंत्री अशोक चव्‍हाण यांच्याविषयी आदर्श प्रकरणात उच्‍च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्‍ही आदर करतो. मात्र, या प्रकरणात अनेक बाबींचा खुलासा बाकी आहे. त्यामुळे लवकर भाजप सरकार याप्रकरणी पुढील भूमिका जाहीर करणार आहे, असे भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्‍ते माधव भंडारी यांनी सांगितले. राज्यपालांनी चव्‍हाण यांच्यावर खटला चालवण्यास दिलेली परवानगी न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर भंडारी मुंबईत बोलत होते. 

संबंधित : 

आदर्श घोटाळा: अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा

न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय दिला - अशोक चव्हाण

पूर्वीच्या राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून अशोक चव्हाण यांच्या विरोधात आदर्श गैरव्यवहार प्रकरणी खटला दाखल करण्यास परवानगी नाकारली होती. त्याविषयी उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला व अशोक चव्हाण यांना आरोपी का करत नाही, अशी विचारणा केली होती. त्यानंतर विद्यमान राज्यपालांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला दाखल करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता, असे भंडारी यांनी सांगितले. 

उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून भाजप सरकार यापुढील निर्णय घेईल, असे माधव भंडारी यांनी निवेदनात म्‍हटले आहे.