Sat, Aug 24, 2019 23:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेत्री शिखा सिंगची फसवणूक

अभिनेत्री शिखा सिंगची फसवणूक

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 1:04AMठाणे : प्रतिनिधी

विदेशात केलेल्या कार्यक्रमाचे आयोजकाकडून मानधन घेऊनही ही रक्कम शिखासिंगला न देता तिची फसवणूक करणार्‍या व्यक्तीविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हिंदी फिल्म आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम करणारी अभिनेत्री शिखासिंग शहा ही ठाण्यातील पोखरण रोड वरील निहारिका या सोसायटीत राहते. वेस्ट आफ्रिकामध्ये होणार्‍या गाण्यांच्या मिट अँड ग्रीट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दीपक चतुर्वेदी नावाच्या व्यक्‍तीने शिखासिंग हिस ऑफर दिली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिखासिंगला 12 लाख रुपये मानधन देण्याचे ठरले होते. त्यानुसार 17 नोव्हेंबर 2017 रोजी शिखासिंगने वेस्ट आफ्रिकेतील या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र हा कार्यक्रम होऊनही चतुर्वेदीने शिखासिंगला फक्त 70 हजार रुपये दिले आणि उर्वरित 11 लाख 30 हजारांची रक्कम दिलीच नाही. वारंवार संपर्क करूनही पैसे मिळत नसल्याने शिखासिंगने या कार्यक्रमाच्या आयोजकांची भेट घेतली असता शिखासिंगच्या मानधनाची संपूर्ण रक्कम चतुर्वेदीस दिली गेली असल्याचे आयोजकांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिखासिंगने 24 फेब्रुवारीला चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दीपक चतुर्वेदीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.