होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:12AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

दौड, मन, सत्या, रंगीला, हेराफेरी, बादशाह यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षाचे होते.

गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमामध्ये होते. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला होता. नीरज यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी शिफ्ट कऱण्यात आले होते. फिरोज नाडियाडवालानी संपूर्ण जबाबदारी घेतली होती. फिरोजने जुहूस्थित आपल्या घरातच त्यांच्यासाठी एक रूम आयसीयू बनवली होती. मार्च 2017 पासून 24 तास नीरज यांच्यासाठी एक नर्स, वॉर्ड बॉय आणि कुक यांच्या सेवेत होता.