Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; मदतीचे आवाहन

अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; मदतीचे आवाहन

Published On: Jan 16 2018 11:43AM | Last Updated: Jan 16 2018 11:43AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

अभिनेता विकास समुद्रे यांना ब्रेन हॅमरेज मुळे मीरारोड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे समुद्रे यांना त्यांच्या मित्रांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उपचारांसाठी मोठ्या रक्कमेची गरज भासत आहे.

मात्र विकासची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा व त्याच्यावर उपचार कसे करायचे हा प्रश्‍न त्याच्या कुटुंबियांना व मित्रांना पडला आहे. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्याच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.