Mon, Jun 17, 2019 19:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

Published On: Dec 04 2017 6:14PM | Last Updated: Dec 04 2017 6:39PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या कोकीळाबेन रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडवरांना धक्का बसला आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत हॅपी गो लकी म्हणून ओळख असलेल्या शशी कपूर यांनी कपूर घराण्याचा कोणताही स्तोम माजवला नाही. सदैव जमिनीवर पाय असलेल्या या कलाकराने मल्टिस्टारर अनेक चित्रपटांमध्ये काम करताना आपली ठसा उमटवला. इंटस्ट्रिचा अनुभव आणि कपूर घराण्याची पार्श्वभूमी असूनही, त्यांनी अनेकदा दुय्यम भूमिका स्वीकारण्याचीही तयारी दर्शविली. जब जब फूल खिले, सत्यम शिवम सुंदरम् या चित्रपटांतील भूमिका विशेष लक्षात राहिल्या. सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांची जोडी कमालीची हिट ठरली. त्यांनी दिवार, त्रिशूल, कालापत्थर, हेराफेरी, शान, सुहाग, असे एकसे एक हिट सिनेमे इंडस्टिला दिले. वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कपूर कुटुंबातील ते तिसरे सदस्य होते.

शशींचा जन्म १० मार्च १९३८ कोलकत्यामध्ये झाला होता. शशी कपूर यांना तिन आठवड्यांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शशी यांनी तब्बल १६० चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी १४८ हिंदी तर इंग्रजी चित्रपट होते. 

गाजलेले चित्रपट

शशी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण,  ६० - ७० च्या दशकातील त्यांचे  ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मीली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ ‘फकीरा’ हे चित्रपट अधीक गाजले.

पुरस्कार 

२०११ मध्ये पद्म भूषण

२०१५ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ 

१९९४ मध्ये ‘मुहाफीज’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

१९७९ मध्ये जुनून या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

२०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार

 

Image result for shashi kapoor

Image result for shashi kapoor

Image result for shashi kapoor

Image result for shashi kapoor family