होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन

Published On: Jul 17 2018 10:55AM | Last Updated: Jul 17 2018 10:55AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी(वय, ६२) यांचे आज ( दि. १७ जुलै) सकाळी निधन झाले आहे. अभिनेते शिशिर शर्मा यांनी आपल्या फेसबुक पेजवर रीटा भादुरी यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मूत्रपिंडाची समस्या असल्याने त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्‍यांचे निधन झाले. 

'निमकी मुखिया'मध्ये त्या आजीची भूमिका साकारत होत्या. ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली. आरोग्याची समस्या असतानाही त्या नियमित शूटिंगला जात आणि शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत सेटवरच आराम करत होत्या.

'वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांना घाबरुन काम करणं का सोडावं? काम करणे आणि त्यात व्यस्त राहणे मला आवडते. आजाराविषयी सतत विचार करत बसणे मला पसंत नाही. यासाठी मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते,' असे काही दिवसांपूर्वी रीटा त्यांनी म्हटलं होते. 

रीटा यांचे सिनेमे 
'सावन को आने दो', 'राजा', 'लव्ह', 'विरासत', 'घर हो तो ऐसा' 

त्‍यांनी भूमिका केल्‍या मालिका
'साराभाई वर्सेस साराभाई', 'अमानत', 'एक नई पहचान', 'बायबल की कहानियाँ'