Fri, Nov 16, 2018 01:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेत्री रविना टंडन होणार नॅशनल पार्कची अ‍ॅम्बॅसिडर

अभिनेत्री रविना टंडन होणार नॅशनल पार्कची अ‍ॅम्बॅसिडर

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत अर्थात नॅशनल पार्क अ‍ॅम्बॅसिडर म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन हिने मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतचा प्रस्ताव टंडनला दिला होता. त्याचा स्वीकृतीचे पत्र तिने वनमंत्र्यांना पाठवले आहे. वनविकास, वन्यजीव संवर्धनातील रूची असल्याने रविना टंडन वन विभागाच्या विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवत होती.

हीच बाब लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत होण्याची विनंती तिला केली होती. त्यास रविनाने होकार दिला असून जंगल संवर्धन, संरक्षणाची व्यापक जनजागृती आणि उद्यान विकासासाठी विविध उपक्रमांच्या आखणीच्या कामात त्यांची मोलाची मदत होईल असा विश्‍वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.