Mon, Jun 17, 2019 18:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माधवी जुवेकरला डान्‍स भोवला, बेस्‍टमधून बडतर्फ

माधवी जुवेकरला डान्‍स भोवला, बेस्‍टमधून बडतर्फ

Published On: Aug 27 2018 4:34PM | Last Updated: Aug 27 2018 4:40PMमुंबई  : राजेश सावंत 

दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डान्स केला म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री माधवी जुवेकर व अन्य सात कर्मचार्यांना बेस्ट सेवेतून थेट बडतर्फ केले. या कारवाईचे तीव्र पडसाद बेस्टमध्ये उमटले. त्यामुळे ही कारवाई मागे घेण्यासाठी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी महाव्यवस्थापकांना आदेश दिले आहेत.

मराठी एक्ट्रेस का 'डर्टी डांस' VIRAL, मुंह से ऐसे लिए नोट

मराठी एक्ट्रेस का 'डर्टी डांस' VIRAL, मुंह से ऐसे लिए नोट

बेस्टमध्ये दिवाळीला सर्वच खात्यात स्नेहभोजन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येतो. नोव्हेंबर २०१७  मध्ये वडाळा आगार येथे स्नेहसंमेलनचे आयोजित केले होते. या कार्यक्रमात एक कर्मचारी म्हणून माधवी जुवेकर यांनी अन्य कर्मचार्यांसमवेत डान्स केला. यावेळी पैसे उडवण्यात आले. यावरून बेस्टला टिकेचे लक्ष करण्यात आले. 

मराठी एक्ट्रेस का 'डर्टी डांस' VIRAL, मुंह से ऐसे लिए नोट

समज देता अली असती पण बडतर्फ ही शिक्षा मोठी 

याची दखल घेऊन तत्कालीन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ  यांनी चौकशीचे आदेश दिले. याचा अहवाल गेल्या आठवड्यात महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांना सादर केला. या अहवालात बेस्टची इज्जत चव्हाट्यावर आणला. म्हणून जुवेकर व अन्य सात कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले. जुवेकर यांना समज देऊनही सोडता आले असते. बडतर्फ ही शिक्षा मोठी असल्याचे मत विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी व्यक्त केले.