Sat, Jul 04, 2020 14:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई योग्यच!

सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई योग्यच!

Last Updated: Jun 06 2020 8:37PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या संकटात सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत मुंबई पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकाचे राज्य सरकारने समर्थनच केले. पोलिसांनी काढलेले हे परीपत्रक कायद्यानुसार असून पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात केला.

वाचा :दहा जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू

लॉकडाऊनच्या काळात पोलिस आयुक्तांनी २३ मे रोजी सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात परीपत्रक जारी केले. जी व्यक्ती सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवेल, अफवा पसरवेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असून, हा आदेश ८ जून पर्यंत लागू राहणार असल्याचेही त्यात नुमद करण्यात आले आहे. या परिपत्रकाविरोधात अ‍ॅड. शेषनाथ मिश्रा आणि फ्री स्पीच कलेक्टिव्ह या संस्थेच्यावतीने हायकोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी काढलेले हे परिपत्रक अनियंत्रित आणि हेतू पुरस्कृत आहे. या आदेशामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला.  या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

वाचा : वैद्यकीय परीक्षेसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

यावेळी राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडत परिपत्रकाचे समर्थन केले. पोलिसांनी काढलेले हे परिपत्रक कायद्यानुसार असून, या आदेशामुळे लोकांचे हित जपले जाणार असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. न्यायालयाने याचिका दखल घेत राज्य सरकारला यासंदर्भात तीन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली.

वाचा :दहा जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू