Wed, Jul 24, 2019 12:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्पना बारवर कारवाई; 10 बारबालांना अटक

कल्पना बारवर कारवाई; 10 बारबालांना अटक

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 11 2018 12:57AMमुंबई : प्रतिनिधी

ग्रँटरोड परिसरातील कल्पना बारवरील कारवाई अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी 38 जणांना अटक केली. त्यात बारचा मॅनेजरसह इतर कर्मचारी आणि दहा बारबालांचा समावेश आहे. अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

शहरात काही बारमध्ये डान्स परवाना नाही, तरीही या बारमध्ये डान्स बार सुरु असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. ग्रँटरोड येथील त्रिभुवन रोडवर कल्पना नावाचे एक बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंट असून या बारमध्ये डान्स परवाना नसतानाही तिथे रात्री उशिरापर्यंत बारबालांना कामावर ठेवून त्यांना तिथे येणार्‍या गिर्‍हाईकांसोबत अश्‍लील चाळे करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीनंतर या पथकाने शनिवारी रात्री उशिरा कल्पना बारवर कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 28 पुरुष आणि दहा महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या सर्वांना नंतर डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. 38 जणांना नंतर पोलिसांनी विविध भादवी कलमांतर्गत अटक केली. त्यात बारचा मॅनेजर, कॅशिअर, वेटर, ग्राहक आणि बारबालांचा समावेश होता. 

या सर्वांना रविवारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी बारच्या कर्मचार्‍यासह ग्राहकांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत बारमधून पोलिसांनी 84 हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे.