Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवली, दहिसरमधील आईस्क्रीम पार्लरवर कारवाई

कांदिवली, दहिसरमधील आईस्क्रीम पार्लरवर कारवाई

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:17AMजोगेश्वरी : वार्ताहर

अन्न व औषध प्रशासनाने कांदिवली, दहिसरमध्ये आईस्कीम उत्पादन करणार्‍या दोन कंपन्यांवर धाड टाकून कारवाई केली. चारकोप सेक्टर 8 मधील प्लॉट क्रमांक 82 मध्ये दीप्ती डिसर्ट तर दहिसरच्या कांदळपाडा प्रमिला नगरमधील सुपर स्टार मीना आइस्क्रीम पार्लरमध्ये निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीम विकण्यात येत असल्याच्या तक्रारी अन्न, औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींची शहनिशा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईत शरीराला हानिकारक आईस्क्रीम जप्त करण्यात आले. 

कारवाई दरम्यान कांदिवलीत आईस्क्रीममध्ये हानिकारक पदार्थ आढळून आले. मुदत संपलेले फ्लेवर वापरण्यात येत होते. तसेच कलर आणि पदार्थांची तारीख संपलेली आढळून आली. जवळपास मलाई कुल्फी 10 किलो व आईस्क्रीम बटर स्कॉच 178 लीटर जप्त केला. या कंपनीतून 52 हजार 700 रुपयांचे आईस्क्रीम जप्त करून नमूने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर, दहिसरमध्येही आईस्क्रीमचा साठा करण्याचा परवाना न घेता पार्लर सुरू होते. या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अन्न-औषध प्रशासनाचे उपायुक्त अजित मैत्रे यांच्या उपस्थितीत अधिकारी के. शिरसागर, वि.डी.गायकवाड,  टी.जी. लोखंडे यांनी  ही कारवाई केली.