Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या ११ आंदोलकांवर पुन्हा कारवाई

मनसेच्या ११ आंदोलकांवर पुन्हा कारवाई

Published On: Dec 03 2017 1:43AM | Last Updated: Dec 03 2017 1:28AM

बुकमार्क करा

डोंबिवली :

मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह 11 आंदोलनकर्त्यांवर रामनगर पोलिसांनी चॅप्टर प्रोसेडिंगअंतर्गत शुक्रवारी कारवाई केली. पुढील कारवाई आता डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्याकडे होणार आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात  मनसेने 22 ऑक्टोबर रोजी आक्रमक आंदोलन केले. या प्रकरणी 11 जणांवर दंगलीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हाध्यक्ष तथा केडीएमसीचे गटनेते प्रकाश भोईर, केडीएमटी सदस्य प्रल्हाद म्हात्रे, प्रकाश माने, सागर जेधे, रवींद्र गरूड, सिद्धार्थ मातोंडकर आदींचा समावेश होता. कल्याण कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. 

पोलिसांनी आता नव्याने चॅप्टर प्रोसेडिंग कारवाई सुरू केली आहे. मनोज घरत, प्रकाश भोईर यांना एक लाखांचा बाँड, तसेच परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, प्रकाश माने, सागर जेधे, रवींद्र गरूड, सिद्धार्थ मातोंडकर, रितिकेश गवळी, अजय शिंदे , कृष्णा देवकर, गणेश गावडे यांचा 15 हजारांचा बाँड भरून घेण्यात आला.