Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येचा आरोप करीत उकळली खंडणी 

हत्येचा आरोप करीत उकळली खंडणी 

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 1:05AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहरातील बालाजी नगर या परिसरातील एकाचा भांडणातून मृत्यू झाला. मृताच्या मेहुण्याने त्याच्या मित्रास तूच आपल्या बहिणीच्या नवर्‍याची हत्या करण्यास सांगितल्याचा आरोप करीत त्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर मित्राला चोवीस तास डांबून ठेवत त्याच्याकडून 25 हजार रुपये व एक लाख रुपयांचा धनादेश खंडणी म्हणून घेतला. दरम्यान, पीडित मित्राने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी निसार व सलीम या दुकलीला अटक केली आहे.  निसारला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी नायब तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कब्रस्तानात दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठवला. तेथील अहवालानंतर ही हत्या या गुंतागुंतीच्या घटनेने पोलीससुद्धा चक्रावून गेले आहेत.

भिवंडी शहरातील बालाजी नगर येथील बंडू गायकवाड या चाळीत राहणारा अस्लम मोहम्मद आरिफ अन्सारी (36) हा मेव्हणा निसार, सलीम व विजय यादव यांच्या सोबत 8 जुलै रोजी सायंकाळी बालाजी नगर परिसरातीलच दोस्ती हॉटेल शेजारील ताडी अड्ड्यावर ताडी पिण्यासाठी गेले होते. ताडी पिऊन विजय यादव व मेव्हणा निसार हे निघून गेल्यानंतर अस्लम व सलीम हे त्याच ठिकाणी ताडी पित असताना त्यांच्यात  वाद होऊन हाणामारी झाली. यात अस्लम हा बेशुद्ध झाला व  खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, साध्या मृत्यू दाखल्याच्या आधारे अस्लमच्या कुटुंबियांनी अस्लमचा मृतदेह बालाजीनगर येथील कब्रस्तानात 8 जुलै रोजी रात्रीच दफन केला.