Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महावितरण भरतीत घोटाळ्याचा आरोप : मराठा समन्वय समिती

महावितरण भरतीत घोटाळ्याचा आरोप : मराठा समन्वय समिती

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

2014 मध्ये महावितरणने 6 हजार 542 पदांसाठी भरती केली. या भरतीत मराठा समाजाला 16 टक्के म्हणजे 1046 जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, महावितरणने 469 जागाच मराठा समाजासाठी दिल्याने या भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला. या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिल्यानंतर जाहीर केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. 

मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बुधवारी बांद्रा येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार होता परंतु, पोलिसांच्या विनंतीवरुन मोर्चा न काढता शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली.  यावेळी महावितरणचे चंद्रशेखर येरमे, पी. एस. पाटील आदी उपस्थित होते. 

भरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाप्रमाणे 1 हजार 46 जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात 469 जागाच मिळाल्या. मग 577 जागा कोणाला दिल्या, असा सवाल आबासाहेब पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी केला. तसेच ज्या मराठा तरुणांना नोकर्‍या मिळाल्या त्यांना अजूनही कायम करण्यात आले नसल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. ऊर्जा खात्यामध्ये 24 हजार ग्राम विद्युत सेवक पदांसाठी भरतीसाठी जाहिराती देण्यात आली आहे. एका बाजुला मराठा समाजाला भरती स्थगित करण्याचे आश्‍वासन द्यायचे आणि दुसरीकडे भरती सुरू ठेवायची हा दुटप्पीपणा आहे. विद्युत सहाय्यक भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार झालेला आहे. या भरती प्रक्रियेत जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची माहिती आम्हाला मिळायला पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.