Sun, Jan 20, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अबू सालेम म्हणतोय मला निकाह करायचाय

अबू सालेम म्हणतोय मला निकाह करायचाय

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:08AMठाणे : नरेंद्र राठोड

मुंब्रा येथील हिना नामक तरुणीशी माझा ट्रेनमध्ये निकाह झालाच नव्हता. ती फक्‍त भेटण्यास आली होती. मात्र, मीडियात आलेल्या वृत्तांमुळे तिचे नाव माझ्याशी जोडले गेले व तिची बदनामी झाली. मला आता तिच्याशी विवाह करावाच लागणार आहे. 5 मे 2018 ही आमच्या निकाहची तारिख ठरली आहे, अशी बतावणी केली आहे ती डॉन अबू सालेम याला. निकाहासाठी आपणांस संचित रजा (पॅरोल)  मिळावी, असे पत्रही त्याने गृहविभाग आणि तळोजा जेल प्रशासनाला संचित रजा (पॅरोल) मिळावी म्हणून पत्रही दिले आहे.

डॉन अबू सालेमला 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. सध्या अबू तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याने राज्य गृहविभाग आणि तळोजा मध्यवर्ती कारागृहाला 11 आणि 16 एप्रिल रोजी दोन पत्रे पाठवली आहेत. त्यात, लग्‍नासाठी त्याने 45 दिवसांचा पॅरोल मागितला आहे. तो म्हणतो की, मला लखनऊ कोर्टात पोलीस नेत असताना हिना उर्फ कौसर बहार मला भेटायला आली. मात्र, काही वृत्तपत्रात माझा व हिनाचा निकाह झाल्याचे प्रसिद्ध झाले. हिनाचे नाव विनाकारणच माझ्या नावाशी जुळले गेले. 

Tags : Mumbai, Abu Salem, I want to get married, Mumbai news,