Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीप्रकरणी अबू सालेमला कारावास 

खंडणीप्रकरणी अबू सालेमला कारावास 

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:54AMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्ली येथील एका व्यावसायीकाला 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोषी धरत दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयाने गँगस्टर अबू सालेम यास 7 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. दिल्ली येथील व्यावसायीक अशोक गुप्ता यांना 2002 साली 5 कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपामध्ये आयपीसी कलम 387, 506/507 प्रमाणे अबू सालेम याला दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी सालेमसह इतर पाचजणांविरोधात सुनावणी सुरु होती. यापैकी चंचल मेहता, माजिद खान, मोहम्मद अशरफ व पवन कुमार यांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, तर सज्जन कुमार सोनी या आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. 

याप्रकरणी 27 मार्चला शेवटची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल प्रलंबीत ठेवला होता. फिर्यादी पक्षाकडे आपल्या विरोधात ठोस पुरावे नाहीत, असा दावा 16 जानेवारी रोजी सालेमतर्फे करण्यात आला होता. यानंतर फेब्रुवारीत कोर्टाने सालेमविरोधात वॉरंट जारी केले.