Mon, Jun 17, 2019 14:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आषाढी एकादशीला 3,781 ज्यादा बसेस

आषाढी एकादशीला 3,781 ज्यादा बसेस

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:42AMमुंबई : प्रतिनिधी

पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी 23 जुलैला भरणार्‍या आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने तयारी केली आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून एकूण 3781 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

पुणे येथे आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठकीवेळी निर्णय घेण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, वरिष्ठ अधिकारी व सर्व जिल्हयाचे विभाग नियंत्रक उपस्थित होते.

आषाढी यात्रेला राज्यभरातून विशेषत: मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पंढरपुरला भाविक येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. 21 जुलै ते 28 जुलै या काळात सुमारे 8 हजार कर्मचारी चोवीस तास सेवा देणार आहेत. यावेळी  msrtc reservation mobile app याचा वापर करता येईल.यावर्षी अभिनव प्रयोग म्हणून पंढरपूर येथील मठ,यात्री निवास,धर्मशाळा येथे वारकर्‍यांचा निवास असतो.त्याठिकाणी जाऊन एसटी कर्मचारी मागणीनुसार आगाऊ आरक्षण करुन देणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे 3 तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहेत.मराठवाड्याच्या प्रवाशांसाठी भिमा बसस्थानक,पुणे -मुंबई येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी चंद्रभागानगर बसस्थानक व जळगाव-नाशिक येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी पंढरपूर जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या तीनही बसस्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी पिण्याचे पाणी,विद्युतसेवा, फिरती स्वछ्तागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका ,प्रत्येक विभाग निहाय चौकशी कक्ष,संगणकीय उद्घोषणा इ. सुविधा देण्यात येणार आहेत.