Fri, Feb 22, 2019 16:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजोबा पर्वत: श्री रामांच्या मुलांचे जन्मस्थान, वाल्मिकी ऋषींची समाधीस्थळ

आजोबा पर्वत: श्री रामांच्या मुलांचे जन्मस्थान (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : अमोल कदम

ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरापासून 48 किलोमीटर वरती आजोबा पर्वत आहे. ह्या पर्वतावर श्री रामाच्या काळामध्ये सीता माता या पर्वतावर आल्या होत्या. ह्याच पर्वताच्या उंच खडकाळ कोरलेल्या भागामध्ये लव आणि कुश यांचा जन्म झाला होता. असे पवित्र ठिकाण ठाणे जिल्ह्याच्या एक टोकाला असून ह्या पर्वतावर रामनवमी तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटक, भक्तगण राज्यातून, देशातून येत आहेत.

श्री रामाच्या काळामध्ये सीता मातेने लव, कुश याना जन्म दिलेल्या ठिकाण पर्वतावर दगडामध्ये कोरलेले आहे. ह्या ठिकाणी सीता माई आपल्या दोन मुलासमावेत राहत होती. ह्याच पर्वताच्या पायथ्याशी वाल्मिकी ऋषींचे आश्रम आहे. या आश्रमामध्ये लव, कुश यांनी धनूरविद्याचे ज्ञान वाल्मिकी ऋषिकडून भेटले आहे. वाल्मिकी ऋषींना लव आणि कुश आजोबा म्हणत असत, त्यामुळे या पर्वताला आजोबा पर्वत असे नाव पडले आहे. या आश्रमात वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. इतिहास कालीन वीरगळ आहेत, ऋषी ज्या ठिकाणी तपश्चर्या करायचे त्या ठिकाणी शंकराची पिंड देखील आहे. आजही त्या ठिकाणी लव आणि कुश यांच्या पाऊलखुणा भक्तगनाना पहावयास मिळतात. त्यामुळे भक्तगण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन आश्रमाची सेवा करत आहेत. 

सह्याद्री डोंगर रांगांच्या सरळ रेषेत हा आजोबा पर्वत आहे. त्याच्या एका बाजूला रतनगड, अलंग मदन कुलंग, कोकणकडा, सांदनदरी तसेच राज्यातील उंच कळसुबाई शिखर देखील या आजोबा पर्वतावरून पहावयास मिळते. तसेच पर्वताच्या दक्षिणेला मालशेज घाटाचा परिसर दिसतो.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर वरून डोलखांब तिथून आजोबा पर्वत असे प्रवास करावा लागतो. या पर्वतावर जाण्याकरिता वाहनाने गेले तर पर्वताच्या पायथ्याशीच वाहने उभी करून ठेवावी लागते आहे. वाल्मिकी ऋषींच्या समाधी स्थळापर्यंत रस्ता माती आणि दगडांचा असल्यामुळे ह्या रस्त्यांवरून वाहने घेऊन जाणे कठीण होते. पायथ्यापासून पर्वतावरील लव, कुश यांच्या जन्मस्थानपर्यंत जाण्याकरिता सुमारे दोन तास वेळ लागतो. एका दिवसांमध्ये आजोबा पर्वतावर जाता येत असल्यामुळे संध्याकाळ पर्यंत घरी परतता येत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक आणि भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Tags : Aaja Parvat, Valmiki Ashram, Lord Rama, Lav, Kush  


  •