Wed, Oct 16, 2019 19:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आधार कार्ड हा अधिकृत वास्तव्याचा पुरावा नाही : हायकोर्ट

आधार कार्ड हा अधिकृत वास्तव्याचा पुरावा नाही : हायकोर्ट

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

घराचा ताबा असल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा वीजबिल आदी कागदपत्रांचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी हा निर्वाळा देताना चार माजी पालिका कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना माटुंगा येथील इमारतीतून बाहेर काढण्याची पालिका प्रशासनाची कारवाई कायम ठेवली़

गेल्या चार दशकापासून माटुंगास्थित लक्ष्मी निवास इमारतीत वास्तव्य असणार्‍या माजी पालिका कर्मचार्‍यांच्या कुटंबीयांनी पालिकेच्या कारवाइ विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी वास्तव्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा वीजबिल सादर केले. पालिका प्रशासनाने त्यांना वीज आणि दूरध्वनी जोडणी घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असू शकते़  परंतु ही प्रमाणपत्रे याचिकाकर्ते वास्तव्य करत असलेल्या इमारतीतील त्यांचा ताबा अधिकृत ठरवू शकत नाही, असे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली.

 

Tags : Aadhar card, not, official proof, residence, High Court,