Sun, May 26, 2019 11:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक! आधारसक्तीमुळे गरीबांचे रेशन बंद

धक्कादायक! आधारसक्तीमुळे गरीबांचे रेशन बंद

Published On: Apr 20 2018 9:35AM | Last Updated: Apr 20 2018 9:35AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत तब्बल 54 लाख लोक रेशनकार्डवरील धान्य घेत असताना केवळ आधारकार्ड लिंक नसल्याने त्यापैकी 21 लाख 82 हजार 525 लोकांना धान्य मिळणे बंद झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

रेशनच्या या लाभार्थ्यांचे आधारकार्ड एक तर लिंक झालेले नाही किंवा त्यांचा अंगठा मशीनशी जुळत नाही. परिणामी, मुंबई, ठाणे भिवंडीतील गोरगरीब जनतेला 3 ते 4 महिन्यांपासून धान्य मिळणे बंद झाल्याची माहिती मुंबई प्रदेश काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गुरुवारी देण्यात आली. आधारकार्डला रेशनकार्डशी लिंक करण्याची सक्ती करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही भाजप सरकारने ही सक्ती केली आहे. या गोंधळामुळे मागच्या मार्च महिन्यात संपूर्ण मुंबईत फक्त 32 % धान्य वितरीत झाले आहे. 

रेशन दुकानांतील पीओएस मशीन खराब असून, काही ठिकाणी मशीन बंद पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्कची मोठी अडचण आहे. शिवाय आधार कार्डला रेशनकार्डशी लिंक करण्याचे काम फक्त 50 टक्केच पूर्ण झालेले आहे, त्यामुळे जोपर्यंत आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक करण्याचे काम संपूर्ण होत नाही व सर्व पीओएस मशीन व्यवस्थित सुरू होत नाहीत, तो पर्यंत सरकारने गरीब जनतेला मोठा दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 


> संपूर्ण मुंबई आणि ठाण्यामध्ये 4200 रेशन दुकाने आहेत.

> ऑगस्ट 2017 मध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रत्येक रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आल्या मात्र या मशीन बंद पडल्या आहेत.

> ठाण्यातील काही रेशन दुकानदारांनी तर चालतच नसल्याने या पीओएस मशीन परत केल्या आहेत.

> काही ठिकाणी कुटुंबातील काही लोकांचे अंगठे जुळतात तर काहींचे जुळत नाही म्हणून पुरेसे धान्य मिळत नाही.

> ज्या कंपन्यांना आधारकार्ड लिंकचे काम दिले त्यातील काही अर्धे काम करून पळून गेलेल्या आहेत. याचा थेट फटका गरीब जनतेला बसत आहे.

Tags : Aadhar Card, Ration Card