Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › होम मिनिस्‍टर झाले 'मिनिस्‍टर'; आदेश बांदेकरांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा

होम मिनिस्‍टर झाले 'मिनिस्‍टर'; आदेश बांदेकरांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा

Published On: Jun 18 2018 6:18PM | Last Updated: Jun 18 2018 7:10PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे होम मिनिस्टर फेम बांदेकर आता मंत्री झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बांदेकर यांना दरमहा 7 हजार 500 रुपये मानधन, समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी भत्ता म्हणून प्रत्येक बैठकीस 500 रुपये, निवासी दूरध्वनीवरील खर्चासाठी प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये तसेच अन्य कार्यालयीन कामासाठी वाहन सुविधेवरील व अन्य खर्च देण्यात येणार आहे.