Wed, Jul 24, 2019 08:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ... तर ATM मधून पैसे काढण्यास एक्स्ट्रा चार्ज  

... तर ATM मधून पैसे काढण्यास एक्स्ट्रा चार्ज  

Published On: Apr 19 2018 10:46AM | Last Updated: Apr 19 2018 10:46AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

एटीएम ऑपरेटर्संनी एटीएम व्यवहाराच्या अंतर्गत व्यवहारासंदर्भात वाढीव दराची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी एटीएम ऑपरेटर्संनी ही भूमिका घेतली आहे. त्यांची मागणी मान्य झाल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज आकारण्यात येईल. सध्याच्या घडीला सर्व बँका दुसऱ्या बँकेच्या ग्राहकाला एटीएमवरील कॅश व्यवहारासाठी १५ रुपये तर याशिवाय इतर व्यवहारासाठी ५ रुपये आकारतात.

एटीएम ऑपरेटर्संनी केलेली मागणी मान्य झाल्यास ग्राहकांना एटीएमच्या व्यवहारासाठी अधिक चार्ज द्यावा लागेल. कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (सीएटीएमआई)ने केलेल्या मागणीनुसार, सेवेपोटी कमीत कमी ३ ते ५ रुपये दर वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. आरबीआयच्या कठोर धोरणामुळे एटीएम सर्विस प्रोव्हायडर्संना चार्ज वाढवल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे मत  सीएटीएमआयचे अधिकारी के श्रीनिवास यांनी सांगितले.  

एटीएम सर्विस प्रोव्हायडर्संनी ३०० कॅश व्हॅन, गाडीच्या प्रत्येकी एका ड्रायव्हरसोबत २ सुरक्षा रक्षक आणि २ गनमॅन बंधनकारक करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. परिणामी एटीएम सेवा महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Tagas : ATM, ATM Operators, Interchange Rates, Bank Customers