Sat, Jul 20, 2019 03:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एड्सग्रस्तांशी भेदभाव कराल तर जेलमध्ये जाल

एड्सग्रस्तांशी भेदभाव कराल तर जेलमध्ये जाल

Published On: Sep 13 2018 2:14AM | Last Updated: Sep 13 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी

देशभरात कखत-अखऊड कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे  एचआयव्ही एड्सग्रस्तांना समान वागणूक मिळणार आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीला आता एचआयव्ही रुग्णाशी भेदभाव करता येणार नाही. जर या रुग्णांना चुकीची वागणूक दिली तर त्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. जर एखाद्याने अशा रुग्णांशी भेदभाव केला तर मात्र अशा व्यक्तीला जेलची हवा खावी लागणार आहे. 

एचआयव्ही एड्स संदर्भात कायदा असावा यासाठी अनेक वर्षांपासून डॉक्टर आणि समाजसेवी संस्थांकडून प्रयत्न सुरू होते. या कायद्यासाठी सरकारने शिफारशी मागवल्या होत्या. त्यानुसार या नवीन कायद्यात एचआयव्ही रुग्णांसाठी महत्त्वांच्या बाबींवर विचार करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 10 सप्टेंबरपासून देशभरात कखत-अखऊड कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यसभेने मार्च महिन्यात हे विधेयक मंजूर केले होते. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे एचआयव्ही एडस ग्रस्तांना समान वागणूक मिळणार आहे.

एचआयव्ही बाधित रुग्णांना अनेकदा रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिवाय त्यांना उपचार देण्यास नकार दिला जात असतो. रुग्णाला उपचार नाकारणार्‍या डॉक्टरांना दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. आरोग्य विम्यात एचआयव्ही रुग्णांना वगळू नये, शिक्षण आणि नोकरीतून त्यांना आजार आहे म्हणून काढून टाकू नये. डॉक्टरांनी एचआयव्ही रुग्णांचे नाव गुपित ठेवावे असे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. आता हा कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याने एचआयव्ही रुग्णांना नक्कीच फायदा होईल. अशी माहिती एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वरी गिलाडा यांनी दिली आहे.

एचआयव्ही रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने हा कायदा असणार आहे. या कायद्यामुळे रुग्णांना शिक्षणात, नोकरीत आणि अन्य बाबींत सवलत मिळेल. एड्सबाधित म्हणून त्यांना दिली जाणारी वाईट वागणूक कमी होईल. कायद्यात कोणत्या तरतूदी करण्यात आल्या आहेत यावर राज्यात बैठक होईल. त्यानंतर राज्यातही या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.