Thu, Apr 18, 2019 16:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › AIB केस : रणवीर, अर्जुनला हायकोर्टाकडून दिलासा नाही 

AIB केस : रणवीर, अर्जुनला हायकोर्टाकडून दिलासा नाही 

Published On: Mar 13 2018 6:32PM | Last Updated: Mar 13 2018 6:32PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरला एआयबीप्रकरणी तात्काळ दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रणवीर आणि अर्जुनने त्यांच्याविरोधात दाखाल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे  अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने याबाबत सुनावणी घेण्यास नकार दिला.  

डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथे आयोजित करण्यात आलेल्‍या एआयबी रोस्ट या कार्यक्रमात महिलांबाबत अत्यंत बिभस्त विनोद केले होते. या प्रकारानंतर संतोष दौंडकर यांनी गिरगाव कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने फेब्रुवारी२०१५ मध्ये मुंबई पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले होते. 

न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी अर्जुन आणि रणवीरवर गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी रणवीर  आणि अर्जुन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र, या याचिकेची प्रत तक्रारदारांना न दिल्यामुळे हायकोर्टाने याप्रकरणी मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार देत, याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.