Thu, Sep 20, 2018 14:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्या नाताळच्या मुहूर्तावर धावणार एसी लोकल! 

उद्या नाताळच्या मुहूर्तावर धावणार एसी लोकल! 

Published On: Dec 24 2017 1:50AM | Last Updated: Dec 24 2017 1:47AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

बहूचर्चित वातानुकूलित लोकल प्रत्यक्षात सेवेत येण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा नाताळच्या दिवशी 25 डिसेंबरपासून संपुष्टात येणार आहे. वर्षभरापूर्वी मुंबईत आगमन झालेल्या या लोकलची पहिली फेरी दुपारी 2.10 मिनिटांनी अंधेरी ते चर्चगेटपर्यंत धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईकरांना नाताळची ही भेट दिली असून त्यामुळे भविष्यातील सर्वच लोकल एसीवर चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचे किमान तिकीट 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. त्यात जीएसटी अंतर्भूत करण्यात आला आहे. 

मुंबईकरांना एसी लोकलची सुविधा देण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु एप्रिल 2016 मध्ये ही लोकल रेल्वेस सपूर्द करण्यात आली. अनेक तांत्रिक अडचणींना तोंड देत या लोकलचा आतापर्यंतचा प्रवास झाला आहे. सुरुवातीला पश्चिम मग हार्बर-मध्य आणि त्यानंतर पुन्हा पश्चिम रेल्वेवर ही सेवा चालविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. 

एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे.