Sun, Mar 24, 2019 10:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संगीत नाटक विद्यापीठातही शिकवा

संगीत नाटक विद्यापीठातही शिकवा

Published On: Jun 13 2018 7:35PM | Last Updated: Jun 14 2018 1:34AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

संगीत नाटक ही मराठी रंगभूमीची देणं आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात तसेच विद्यापीठांमध्ये शिकविले जावे, अशी अपेक्षा 98 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीतीर्र् शिलेदार यांनी बुधवारी व्यक्त केली. 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी केले. रसिकतेचा सूर हरवला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची हाकदेखील दिली. 

रंगदेवतेच्या आराधनेचा वार्षिक उत्सव असलेले 98 वे नाट्यसंमेलन तब्बल 25 वर्षानंतर मुंबईनगरीत बुधवारपासून सुरू झाले. विक्रमी 60 तासांच्या नाट्यजागराची मेजवानी मुलुंडमधील प्रियदर्शनी क्रीडा संकुलात नाट्यरसिकांना वाढलेली आहे. याच संकुलातील दिवंगत सुधाताई करमरकर रंगमंचावर नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी केले. तर रंगमंचावर नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, माजी अध्यक्ष जयंत सावरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वागताध्यक्ष नामदार विनोद तावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी होते. 

कीर्ती शिलेदार पुढे म्हणाल्या, पंढरपूरच्या वारकर्‍याला विठ्ठलाच्या पुुजेचा मान मिळाल्यावर जो आनंद होतो तो आनंद मला अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे झाला आहे. याआधी माझ्या आईने पण हे पद भुषविले आणि मलाही या पदाचा मान मिळाला. माझ्या कारकिर्दीत संगीत रंगभूमी  टिकविण्यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न  करण्याची ग्वाही शिलेदार यांनी दिली.

नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात वेधशाळेचे काहीही अंदाज असले तरी मुंबईत नाटकांचा सतत पाऊस पडत असल्याचे सांगून नाट्यसंमेलनात असलेल्या कार्यक्रमाच्या लगोरीबाबत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतूक केले. रंगमंचावरील राजकारणांच्या वावरामुळे होत असलेल्या टीकेबाबत तावडे यांनी राजकीय नेत्यांऐवजी स्वागताध्यक्ष म्हणून एका कलाकाराची निवड करण्याची प्रथा सुरू करण्याची सूचना केली. तावडे म्हणाले, खरे तर राजकीय नेते देखील चांगले अभिनेते, दिग्दर्शक असतात.

राजकारणातील टाईमींग साधणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभिनेता, पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्तम दिग्दर्शक आहेत. सतत कामात असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत हसरा चेहरा ठेवण्याचा करीत असलेला अभिनय कुणालाच जमणार नाही,विरोधी पक्षात नसतानाही त्या भूमिकेत  असल्याचे भासवण्याची क्षमता असलेले उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे सततचे हसणे हे उत्तम नाट्यकर्मीच आहेत. ही सर्व मंडळी साहित्य, कला, संस्कृती ही राजाश्रय नव्हे तर राजपुरस्कृत असली पाहिजे अशी मानणारी मंडळी असल्याचे सांगून तावडे यांनी नाट्यसंमेलनातील राजकारण्यांच्या वावराचे समर्थन केले.

आम्ही एकत्र दिसतो योगायोग नसतो : राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच रंगकर्मींची फिरकी घेतली. ते म्हणाले, कधीकधी वाटते आमच्याकडे (राजकारणात) नाटके वाढली तर तुमच्याकडे राजकारण वाढलेले दिसते. नाट्यसंमलेनाच्या रंगमंचावर शरद पवार आणि राज ठाकरे हे दुसर्‍यांदा एकत्र येणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार राज यांनी ठाकरी शैलीमध्ये पवार-ठाकरे वारंवार एकत्र दिसण्यामागे रहस्य आणखी वाढवले. राज म्हणाले, आज दुसर्‍यांदा मी शरद पवार साहेब यांच्या सोबत व्यासपीठावर एकत्र आहे. मागे होतो तो त्यांची मुलाखत घेताना होतो. परंतु आम्ही सतत व्यासपीठावर दोघांनी यावे, याची काळजी भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडे  घेतात. त्याचा मला जास्ती आनंद होतो, त्यांच्या मनात काय आहे, याची मला कल्पना नाही. हा काय योगायोग नसतो, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील आगामी राजकारणातील नव्या समीकरणाचे संकेत दिले. 

चित्रपटापेक्षा मराठी माणसाला नाटकाचे वेड असल्याने तुमची जबाबदारी महत्वाची आहे. नाटके खुप आली परंतु नाटके चालतात किती? प्रसाद कांबळी यांच्यावर मोठी जबाबदारी आली. नाटकात शिरलेल्या चुकीच्या गोष्टींवर बेगॉन मारून नष्ट करणे महत्वाचे आहे. नाट्यगृहाच्या तारख्या विकण्यासाठी काही जण स्वतःच्या कंपन्या काढतात हे दुदैवी आहे. नाटकाऐवजी तारखा पोट भरतात. निवडणुकीतील पराभव विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. रंगमंचाप्रमाणे नाटक भव्यदिव्य का दिसत नाही. संहिता सापडत नाही. लेखक  हे सिरिअल, पिक्‍चर लिहित आहेत. आता नाटक मोठे करावे लागेल, भव्यता आणि संहिता हे दोन गोष्टी एकत्र आल्या तर नक्की मराठी माणूस नाटकाकडे वळेल. प्रथम गोष्ट चांगली हवी, भव्यता हवी तोच चिंतेचा विषय आहे. नाटक मोठे करा. भव्यता आणि संहिता हातात हात घालून आले तर मराठी नाटकाला कधीच वाईट दिवस येणार नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज यांनी केले.

सादरीकरणात कमतरता : पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  मराठी नाटकात आशय-विषय आहेत, परंतु सादरीकरणात कमतरता असल्याचे सांगितले. दुनियेतील बदल मराठी नाटकात आणण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी नाट्यगृहे सुधारण्यावर भर दिला. त्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करीत असताना सरकारवर अवलंबून न राहता रसिक प्रेक्षकांकडून नक्की प्रतिसाद मिळेल, मुघले आजम सारखी नाट्यकृती बनवा. नाविन्यपूर्णतेचा ध्यास, कल्पना, सादरीकरणासाठी कष्ट घ्याययला हवेत, त्याकरिता बाल रंगभूमीचा पाया मजबूत करा, त्यानंतर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी मजबूत होईल. चांगल्या नाट्यगृहांप्रमाणे कलावतांच्या भविष्यासाठी पुरसे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. 

लाईव्ह अपडेट : 

*नाट्यगृहाच्या दर्जा सुधारावा लागेल : पवार 

*नाट्यपरिषदेबद्दल पवारांचे गौरवउद्गार  : पवार 

*युनोस्कोने आळेकरांचा सन्मान केला : पवार

*मंगळवेढा : सेवा निवृत मंडल अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले

*आज ‘आंब्याचा’ विषय नको : राज ठाकरे 

*शरद पवार यांचे भाषण सुरु 

*भव्यता आणि संहिता या हातात हात घालून चालाल्या तर मराठी नाटकाला मरण नाही : राज ठाकरे 

*प्रसाद कांबळींवर मोठी जबाबदरी : राज ठाकरे 

*प्रशांत दामलेंचे साखर खालेला माणूस बघायच आहे : राज ठाकरे 

*आता आंब्याचा विषय नको; आपत्यांची आपत्ती माझ्यावर नको संभाजी भिडेंवर उपरोधीक टीका 

*नट्यगृहाच्या तारखा विकण्यासाठी कंपनी काढतात : राज ठाकरे 

*नाटके भरपूर येतात पण , चालतात किती : राज ठाकरे  

*मराठी माणसाला खर वेड नाटकाच आहे : राज ठाकरे 

*५० व्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाट्यसंमेलनांच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पुस्तक  देवून सत्कार

*नाट्यसंमेलनांत प्रथमच   नाटकाच्या पेटीची प्रतिकृती,  उपरणं, अत्तराची कुपी देऊन मान्यवरांचा  सत्कार

*राजकीय नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुशील शिदे आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे हे नाट्यकर्मी, दिगदर्शक, अभिनेते आहेत- विनोद तावडे

*पाच वर्षात नाट्य परिषद  स्वबळावर नाटय संमेलन भरवणार  

*शरद पवार, राज ठाकरे  यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर

*शरद पवार याचे आगमन

*काही मिनिटात उदघाटन कार्तक्रम