Sun, Nov 18, 2018 09:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : ९६ शेळ्या मेंढ्या जप्त

मुंबई : ९६ शेळ्या मेंढ्या जप्त

Published On: Feb 24 2018 8:05PM | Last Updated: Feb 24 2018 6:46PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई येथे अनधिकृतरित्या कत्तलीसाठी शेळ्या व मेढ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनावर आज (शनिवारी) पालिकेच्या दक्षता पथकाने कारवाई केली. या कारवाईत ९६ शेळ्या-मेढ्या जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाई नंतर या शेळ्या देवनार पशुवध गृहखान्यात ठेवण्यात आल्या.

मुंबईत अनधिकृत शेळ्या-मेढ्यांची राजरोसपणे कत्तल होत आहे. देवनार पशुवधखान्यात शेळ्या व मेढ्यांची वैद्यकीय तपासणी करून, त्यांची कत्तल करण्यात येते. मात्र काही व्यापारी परस्परच शेळ्या व मेढ्यांची कत्तल करत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. पालिकेच्या सहाय्यक आयुक्त संगिता हसनाळे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईसाठी शुक्रवारी मध्यरात्री सापळा रचण्यात आला. यावेळी धारावी टाटा पॉवर, 60 फुट रोड येथे मध्यरात्री 1 वाजता अनिधिकृत शेळ्या व मेढ्यांची वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले.      

दक्षता विभागाचे निरिक्षक संदेश गिते व आनंद शिंदे यांनी या गाड्याची थांबून चौकशी केली असता याठिकाणी अनिधिकृत शेळ्या मेढ्यांची वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले. यावेळी दक्षता पथकाने केलेल्या कारवाईत ९६ शेळ्या-मेढ्या जप्त केल्या.