Fri, Jul 03, 2020 04:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चोवीस तासांत राज्यात ९३ पोलिसांना कोरोना

चोवीस तासांत राज्यात ९३ पोलिसांना कोरोना

Last Updated: Jun 02 2020 1:06AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलीस दलातील 8 अधिकारी आणि 85 अंमलदार अशा कोरोनासंबंधी कतर्व्य बाजावत असलेल्या 93 नव्या पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर, कोरोनाच्या संसर्गाने पोलीस मृत्युचा आकडा एकने वाढून 27 झाला आहे.

सर्व प्रकारच्या सुरक्षा बाळगुनही कोरोनाचा संसर्ग होण्याचे वाढते प्रमाण दिवसेंदिवस पोलीस प्रशासनाची चिंता वाढवत आहे. राज्यात दोन आयपीएस अधिकार्‍यांसह महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि अंमलदार अशा एकूण 2 हजार 400 हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांना आतापर्यंत कोरोना रोगाने ग्रासले आहे. 

गेल्या 24 तासात राज्यात 93 नव्या पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून एकूण 1 हजार 514 पोलिसांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.