Tue, Jul 23, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ९२५ किलो गोमांस पकडले तिघांविरुध्द गुन्हा दाखल

९२५ किलो गोमांस पकडले तिघांविरुध्द गुन्हा दाखल

Published On: Mar 11 2018 7:30PM | Last Updated: Mar 11 2018 7:30PMमहाड : प्रतिनिधी

गोमांस वाहतूक करणारा टेंम्पो एका प्राणी संरक्षक संस्थेच्या अधिकाऱ्याने माणगांव पोलिसांच्या मदतीने आज पकडला. या टेंम्पोतून ९२५ किलो वजनाचे आणि १ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

एमएच ०३ बीसी ०१६९ या क्रमांकाच्या टेंपोतून महाडकडून मुंबईकडे गोमांस नेण्यात येत असल्याची माहिती संतोष राजाराम दुबे ( प्राणी संरक्षण अधिकारी, निस्वार्थ चॅरिटेबल ट्रस्ट, गोरेगाव, मुंबई) यांना मिळाली होती. त्यांनी या गाडीचा माणगांवपर्यंत पाठलाग केला आणि माणगांव जुन्या स्टँडनजिक माणगांव पोलिसांच्या मदतीने हा टेंम्पो अडविला.

माणगांव पोलिसांनी या प्रकरणी मुस्ताक मोहम्मद हानिक सय्यद (वय २४), नदीम बाबू कुरेशी (वय २०) आणि अब्दुल रहिम कुरेशी (वय ४५, तिघेहि रा. कुरेशीनगर, दगडी चाळ, कुर्ला मुंबई)  या तिघांना टेंम्पो आणि गोमांसासह ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात भादंवि कलम ३४, ४२९, पशु संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ (क), ९, ९(अ), भारतीय प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९६० चे कलम १० त्याचप्रमाणे मोटार वाहन अधिनियम ६६ )१) १९१ अन्वये गुन्हा दाखल केला. महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. पी.एस. गिरी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.