Mon, May 20, 2019 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिलारी प्रकल्पापोटी गोव्याकडून ८९ कोटींचे येणे

तिलारी प्रकल्पापोटी गोव्याकडून ८९ कोटींचे येणे

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 12:54AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

महाराष्ट्र व गोवा या राज्यांच्या संयुक्त प्रकल्प म्हणुन तिलारी प्रकल्प साकारण्यात आला. मात्र या प्रकल्प खर्चा साठी दोन्ही राज्यांचा जो हिस्सा ठरला होता त्यापोटी गोव्याकडून महाराष्ट्राला 89 कोटी रूपये येणे आहेत. याप्रकरणी काय कारवाई केली त्याबाबत तीन महिन्यात अहवाल सादर करण्याची शिफारस लोकलेखा समितीने केली आहे.

कॅगच्या आर्थिक क्षेत्र अहवालावरील लोकलेखा समितीचा अहवाल विधानसभेत गुरूवारी सादर करण्यात आला. या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे. तिलारी प्रकल्पातील खर्चाचा वाटा गोवा सरकारने उचलला की नाही? व याचा खर्च महाराष्ट्र सरकार करत आहे का? अशी विचारणा या समितीने केली.  या प्रकल्पासाठीच्या खर्चाचा भार हा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यावर पडत असून भूसंपादनाचा निधी, टीडीएस, प्रकल्पाचा खर्च या सर्व रक्कमेचे समायोजन करण्याची प्रक्रीया प्रलंबित असल्याची बाब  लोकलेखा समितीच्या निदर्शनास आली. अद्याप 89 कोटी 76 लाख रूपयांचा निधी मिळणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी दोन्ही राज्यांच्या हिश्यांच्या प्रमाणात खर्चाची विभागणी करण्यात यावी व त्याचा ताळमेळ घालण्यात यावा अशीही शिफारस समितीने केली आहे.  

Tags : Mumbai, Mumbai news, Tillari project, 89 crore comes,  from Goa,