Wed, Jul 17, 2019 20:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकणच चॅम्पियन; मुंबई घसरली

कोकणच चॅम्पियन; मुंबई घसरली

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:42AMमुंबई/ठाणे : प्रतिनिधी

मुंबई विभागाचा बारावीचा निकाल यंदा 87.44 टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल सुमारे 1 टक्याने घटला आहेच, त्याचबरोबर राज्याच्या तुलनेतही यंदा मुंबई विभाग मागे पडला आहे.  गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी 88.21 इतकी होती. ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 85.56 टक्के लागला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा मुलींनीच बाजी मारली असून, मुरबाड तालुक्याचा सर्वाधिक 92.47 टक्के इतका निकाल लागला. ठाणे जिल्ह्याचा 85.56 टक्के एवढा निकाल लागला आहे.

मुंबई शाखानिहाय निकालात एचएससी व्होकेशनलचा निकाल 89.15 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ विज्ञान शाखेचा निकाल 93.10 टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी कला शाखेचा निकाल 79.71 टक्के इतका लागला आहे. जिल्ह्याच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल 87.28 टक्के लागला आहे. तर रायगड 85.62 टक्के, पालघर 86.10, मुंबई शहराचा निकाल 86.6 टक्के, मुंबई पश्‍चिम उपनगर 87.76 टक्के तर  मुंबई पूर्व उपनगराचा 87.76 टक्के इतका लागला आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेच्या निकालात थोडी वाढ झाली आहे.  

‘गुणवंतां’ची मुंबई! 

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईचा निकाल राज्याच्या तुलनेत कमी लागला असला तरी मुंबईत गुणवंताची काही कमी नाही. बारावीच्या निकालात 90 टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागीय मंडळात आहेत. राज्यभरातील 90 टक्के हून अधिक गुण मिळवणार्‍या 5 हजार 486 विद्यार्थ्यांपैकी मुंबईतील तब्बल 2 हजार 288 विद्यार्थी आहेत. तर सर्वाधिक कमी (फक्त 67) विद्यार्थी कोकणात  आहेत. 

मुंबईत प्रवेशात होणार्‍या चुरशीमुळे टक्केवारीला मोठ्या प्रमाणात महत्व आहे. निकालात नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांच्याबरोबर  75 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी मुंबई विभागात सर्वाधिक आहेत. 38 हजार 214 विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. गेल्यावर्षी हे गुण मिळवणारे विद्यार्थी 36 हजार 354 इतके होते.  60 हून अधिक  गूण मिळवलेले विद्यार्थी 89 हजार 900 विद्यार्थी आहेत. यंदा यात घट झाली आहे. गेल्यावर्षी 92 हजार 426 विद्यार्थ्यांनी 60 टक्केहून अधिंक गुण मिळवले होते तर 45 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 1 लाख 24 हजार 183 आहेत. गेल्या वर्षी 1 लाख 29 हजार 699 इतके होते. राज्यभरात 75 टक्केहून अधिक  गुण मिळवणार्‍याची संख्या 1 लाख 25 हजार 139 इतकी आहे. हे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा आधिक आहे. गेल्यावर्षी राज्यभरात 1 लाख 10 हजार  784 होते. तर 60 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 5 वाख 7 हजाल 165 विद्यार्थी यंदाच्या निकालात आहेत.