Sun, Jul 12, 2020 23:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिल्याच दिवशी विमान प्रवाशांना मनस्ताप!; दिल्ली विमानतळावरून ८२ उड्डाणे रद्द 

पहिल्याच दिवशी विमान प्रवाशांना मनस्ताप!; दिल्ली विमानतळावरून ८२ उड्डाणे रद्द 

Last Updated: May 25 2020 3:54PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशव्यापी लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या देशांतर्गत विमानसेवेला सोमवारपासून सुरुवात झाली. तूर्त विमानसेवा सुरु न करण्याच्या काही राज्य सरकारांच्या ठाम भूमिकेमुळे अनेक प्रवाशांना मात्र पहिल्याच दिवशी  मनस्ताप सहन करावा लागला. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची लगबग दिसून आली होती. मात्र, शेवटच्या क्षणी अनेक विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

राजधानीतून सोमवारी १९० विमाने 'टेक ऑफ' करणार होती. पंरतु, वेळेवर ८२ विमानांना रद्द करण्यात आले. मुंबईसाठी उड्डाण करणाऱ्या ८ विमानांसह पुण्याचे एक तर गोव्याला जाणारी २ विमान रद्द करण्यात आली.
 
विमानतळ प्राधिकरणाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता विमाने रद्द करण्यात आल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे. राज्य तसेच केंद्र सरकारांच्या भूमिकेचा फटका त्यामुळे असंख्य प्रवाशांना बसला आहे. 

आयजीआय विमानतळावरून मुंबई, पोर्ट ब्लेअर, कोलकाता, हैदराबाद, इंदोरला जाणारी विमाने रद्द करण्यात आली. मुंबई विमानतळावरूनही अनेक विमाने रद्द करण्यात आली होती. दिल्ली विमानतळावरून १९० विमाने उड्डाण घेतील तसेच १९० विमानांचे लॅंडिंग होईल अशी माहिती अगोदर देण्यात आली होती. पंरतु, अनेक विमाने रद्द करण्यात आल्याने ११८ विमानांचेच लॅंडिंग तसेच १२५ विमाने उड्डाण घेतील असे विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अनेक राज्यांनी विमानांना परवानगी न दिल्यामुळे विमाने रद्द करण्यात आल्याची स्पष्टोक्ती आता देण्यात आली आहे. 

अनेक प्रवाशांना विमान उड्डाणासंबंधी कन्फर्मेशन मेसेज आला होते. पंरतु, विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानच रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. अनेक प्रवाशांना विमानतळावरील सुरक्षा तपासणी केल्यानंतर विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली. 
विमानतळ प्राधिकरणाकडून कुठलाही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असा आरोप त्यामुळे प्रवाशांकडून करण्यात आला आहे. २८ मे पासून पश्चिम बंगालमध्ये विमानसेवेला परवागनी देण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र सरकारने मुंबई विमानतळावर केवळ २५ विमानांना टेक ऑफ तसेच लॅन्डिगची परवानगी दिली आहे. २५ मे पर्यंत प्रवासी विमानांवर तामिळनाडू सरकारने बंदी घातल्याने रद्द करण्यात आलेल्या विमानांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

आयजीआय विमानतळावरून रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट्स (मुंबई, पुणे आणि गोवा)  
फ्लाइट क्रमांक  विमानतळ  निर्धारित वेळ 
6E-5335            मुंबई           ५. २५ वाजता 
I5-314               मुंबई            ५.४० 
AI- 887             मुंबई            ६.५०  
UK – 943         मुंबई             ७. ३० 
6E-5339          मुंबई             ९.२५ 
6E-6957          मुंबई            ११.५० 
AI-962             मुंबई            १२.५५ 
UK-933           मुंबई            १५.१५ 
UK-991           पुणे              १७.४० 
I5-798            गोवा             १२.४० 
UK-847          गोवा             ११.०० 

या देखील फ्लाईट्स रद्द 
6E-282 – पोर्टब्‍लेयर
I5-548 - कोलकाता 
AI- 533 - अहमदाबाद 
6E-765 - हैदराबाद 
I5-752 - इंदोर 
AI- 439 – चेन्‍नई 
SG – 263- कोलकाता 
6E- 2701 – भुवनेश्‍वर
UK- 897 – त्रिवेंद्रम 
AI- 401 – कोलकाता 
AI-560 – हैदराबाद 
UK – 705 – कोलकाता 
E-5001 – चेन्‍नई 
6E – 377 – कोलकाता 
AI- 879 – बागड़ोगरा 
UK-725 – बागडोगरा 
I5-742 – बागड़ोगरा 
UK – 833 – चेन्‍नई 
UK – 611 – जम्‍मू 
6E – 6457 – कोलकाता 
SG-2731 – आदमपुर 
AI- 9713 – धर्मशाळा 
UK -885 – कोच्ची 
UK-817 – बंगळूर 
AI-764 – कोलाकता 
AI- 1950 – जयपुर 
I5-757 – हैदराबाद 
I5-795 – अहमदाबाद 
I5 – 721 – बंगळूर 
AI- 1948 – कोच्ची