Sat, Apr 04, 2020 17:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावी : पहिल्या दिवशी ८२ कॉपीबहाद्दर

बारावी : पहिल्या दिवशी ८२ कॉपीबहाद्दर

Last Updated: Feb 19 2020 1:20AM
नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात मंगळवार 18 फेब्रुवारीपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यातील नऊ विभागांपैकी सात विभागांत 82 कॉपीबहाद्दर सापडले. यामध्ये लातूर विभागात सर्वाधिक 34 विद्यार्थी सापडले. तर नाशिकमध्ये 18 विद्यार्थी विभागीय मंडळाच्या भरारी पथकाच्या जाळ्यात अडकले. मुंबई आणि कोकण विभाग कॉपीमुक्त होता. 

सर्व विभागांत स्वतंत्र भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण नऊ विभागांत प्रत्येक विभागीय मंडळाअंतर्गत दहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. ही पथके आपल्या विभागीय मंडळाच्या क्षेत्रात असलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन तपासणी करतात. त्यानुसार आज झालेल्या पहिल्या इंग्रजीच्या पेपरला राज्यात 82 विद्याथीर्र् कॉपी करताना सापडले. त्यामध्ये  पुणे 06, नागपूर 04, औरंगाबाद 07, कोल्हापूर 04, अमरावती 09, नाशिक 18, लातूर 34 अशा सात विभागांत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बारावीचा पहिलाच इंग्रजीचा पेपर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी सक्?तीचा असल्याने सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होती. इंग्रजीचा पेपर मुंबई विभागात सुरळीत झाल्याचा दावा विभागीय मंडळाने केला. आजच्या पेपरसंदर्भात राज्य मंडळाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

मुंबई विभागीय मंडळातून 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पेपर दिला. परीक्षा केंद्रावर 10.30 च्या अगोदर पोहोचण्याची सक्?ती विद्यार्थ्यांना केल्याने हॉलतिकिटावर नमूद केलेल्या परीक्षाकेंद्रावर पालक आणि विद्यार्थी यांनी सव्वा दहा वाजता  गर्दी  केली होती.