Thu, Jul 18, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसतिगृह निर्वाहभत्त्यासाठी उत्पन्नमर्यादा 8 लाखांवर

वसतिगृह निर्वाहभत्त्यासाठी उत्पन्नमर्यादा 8 लाखांवर

Published On: Jun 19 2018 1:44AM | Last Updated: Jun 19 2018 1:37AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठीची कुटुंब उत्पन्नमर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आणखी सोपे होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठीची कुटुंब उत्पन्नमर्यादा यापूर्वी 6 लाख रुपये होती.   महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने त्यामध्ये आता 8 लाखांपर्यंत वाढ केली आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.