Wed, Jan 16, 2019 20:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकर्‍या : मुख्यमंत्री

दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकर्‍या : मुख्यमंत्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

दरवर्षी 36 हजार याप्रमाणे येत्या दोन वर्षांत विविध खात्यांतील 72 हजार सरकारी जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास आदी खात्यांचा समावेश आहे. 

विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात रखडलेल्या शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिक्षकच नव्हे, तर विविध विभागांतील रिक्‍त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. ग्रामविकास विभागात 11 हजार 500, सार्वजनिक बांधकाम विभागात 8 हजार 337, जलसंपदा विभाग 8 हजार 227, कृषी 2 हजार 572, पशु संवर्धन व दुग्धविकास 1 हजार 47, मत्सव्यवसाय विभाग 90, गृह विभाग 7 हजार 111, जलसंधारण 4 हजार 223, नगरविकास विभाग 1 हजार 500, सार्वजनिक आरोग्य 1 हजार आदी मिळून दोन वर्षांत 72 हजार जागा भरण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Tags : 72 thousand government job, two year, Chief Minister, Announcement, mumbai news,


  •