Mon, Nov 19, 2018 14:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे स्थानकांवर सरकार उभारणार ७ हजार प्राथमिक आरोग्य केंद्र

रेल्वे स्थानकांवर सरकार उभारणार ७ हजार प्राथमिक आरोग्य केंद्र

Published On: Feb 17 2018 11:13AM | Last Updated: Feb 17 2018 11:13AMमुंबई  : प्रतिनिधी 

लवकरच देशभरातील ७००० रेल्वे स्टेशनवर प्राथमिक आरोग्य केंद्र, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशिन आणि जनऔषधी स्टोअर सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत विशेष योजना आखली आहे. सामान्यांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
 रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाने ट्वीटकरून ही माहिती दिली आहे.

या योजनेबाबत रेल्वे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयात सध्या चर्चा सुरू आहे. निवृत्त डॉक्टर किंवा लष्करी रुग्णालयातील माजी कर्मचारी अधिकारी यांची या योजनेअंतर्गत सेवा घेता येणे शक्य आहे का, याबाबत विचार सुरु आहे.

भारतीये रेल्वेचे जाळे गावागावात पसरलेलं आहे. त्यामुळे ही योजना योग्यरित्या कार्यान्वित करण्यात आली तर लोकांना याचा फायदा होईल असं अधिकाऱ्यांचे मत आहे.