Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्यात ७ जखमी(व्‍हिडिओ)

मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्यात ७ जखमी(व्‍हिडिओ)

Published On: Jan 13 2018 12:13PM | Last Updated: Jan 13 2018 12:44PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुलुंडमधील नाणेपाडा भागात दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला. ६ तासांच्या अथक प्रयत्‍नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. त्यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्‍ल्यात ७ जण जखमी झाले आहेत. दरम्यान संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यानाजवळ असणार्‍या मुलुंड आणि ठाण्यात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला आहे. 

मुलुंडच्या पूर्व भागात यापूर्वी बिबटे आढळल्याची घटना घडली नव्‍हती. मात्र, आज पहाटे एक नव्‍हे तर दोन बिबटे नाणेपाडा परिसरातील दाट वस्‍तीत घुसले. त्यामुळे स्‍थानिक नागरिकांचा थरकाप उडाला. त्यातच गर्दी पाहून बिबट्या बिथरला आणि त्याने स्‍थानिक लोकांवर हल्‍ला केला. या हल्‍ल्यात बालाजी कामटे (४०), कृष्‍ण पिल्‍ले(४०), सविता कुटे(३०), गणेश पुजारी(४५) यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सायन रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.  

नाणेपाडा भागात बिबट्या घुसल्याची बातमी कळताच त्याला पाहण्यासाठी स्‍थानिक लोकांनी गर्दी केली होती. वन विभागाला व पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्‍थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्यांना पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, लोकांच्या गर्दीमुळे बिबट्यांना पकडण्यात अडथळे येत होते. अखेर ६ तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. बेशुद्ध करून बिबट्याला वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले.

बिबट्या आल्याचे वृत्त समजताच खासदार किरीट सोमय्या, स्थानिक नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी तिथे धाव घेतली. खासदार सोमय्‍या यांनी याबाबत ट्‍विटरवरून माहिती दिली आहे. 

 

वाचा इतर महत्त्‍वाच्या बातम्या

सांगलीतील अपघाताने महाराष्‍ट्र हळहळला; ६ पैलवानांचा मृत्यू

कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर ईडीचे छापे

सण पत्नीचा...संक्रांत पतीराजावर! 

प्रसारमाध्यमांवर ७२% भारतीयांचा विश्‍वास!