Sun, Feb 17, 2019 13:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ६४ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करून हत्या

६४ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करून हत्या

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका 64 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर अतिप्रसंग तसेच तिची हत्या करुन कोलकाता येथून मुंबईत आलेल्या दोन मारेकर्‍यांना शनिवारी सकाळी एमआरए मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सफाई कर्मचारी सुभाकर दुलाल सिखदर आणि बिगारी कामगार गोविंद हरिपोदू सरकार अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही येथील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेची माहिती कोलकाताच्या स्थानिक पोलिसांना कळविण्यात आली आहे. 

माणिका बक्क्ष ही 64 वर्षांची महिला कोलकाताच्या रानगाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. शुक्रवारी तिच्या घरी या दोघांनी प्रवेश केला. या दोघांनीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने या दोघांचा प्रतिकार करुन आरडाओरड केला. यावेळी पकडले जाण्याच्या भीतीने या दोघांनी तिची हत्या करुन तेथून पळ काढला. हा प्रकार नंतर रेखा खराती या महिलेस समजताच तिने स्थानिक पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर रानगाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीनंतर या हत्येत सुभाकर आणि गोविंद यांचा सहभाग उघडकीस आला होता, मात्र हत्येनंतर ते दोघेही मुंबईत पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी सीएसटी रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती एमआरए मार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून सुभाकर सिखदर आणि गोविंद सरकार या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्यांनी माणिक बक्क्षी या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे.