Wed, Apr 24, 2019 20:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गावांच्या परिवर्तनासाठी तब्बल 61 करार

गावांच्या परिवर्तनासाठी तब्बल 61 करार

Published On: Jun 29 2018 1:30AM | Last Updated: Jun 29 2018 1:26AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील एक हजार गावांच्या विकासासाठी राज्य सरकारने विविध संस्थांसोबत केलेल्या 61 सामंजस्य करारांमुळे राज्यात महापरिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला.

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनच्या वतीने बांद्रा कुर्ला संकुल येथे आयोजित कार्यक्रमात हे करार करण्यात आले. यावेळी आरे भूषण हे व्हिटामिन डी फोर्टिफाईड दूध व डबल फोर्टिफाईड मिठाचे लोकार्पण, फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे अनावरण व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आरोग्य बँक उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने एक हजार गावांच्या परिवर्तनासाठी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनची स्थापना केली आहे. राज्यातील ही मॉडेल गावे म्हणून तयार करणार असून या गावांमध्ये देशातील सर्वोत्तम सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. आरोग्य, जलसंधारण, पोषण, कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रात काम करण्यात येणार आहे. समाजातील विविध संस्था, संघटनांच्या मान्यवर प्रतिनिधिंनी आपला अमूल्य वेळ व पैसा यासाठी दिला आहे. यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. या सगळ्यांनी मिळून नवीन भागीदारी तयार केल्यामुळे सामान्य माणसाला मदत होत आहे.