होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ६०० चौ.फू. पर्यंतच्या अवैध बांधकामांना दंड माफ

६०० चौ.फू. पर्यंतच्या अवैध बांधकामांना दंड माफ

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 2:07AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर शास्ती आकारताना त्यामध्ये एकवाक्यता असावी आणि अनधिकृत निवासी बांधकामांना आळा बसावा यासाठी शास्ती आकारणीचे दर आता राज्य सरकार ठरवणार असून संबंधित अधिनियमात सुधारणा करुन ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अवैध बांधकामांना या निर्णयाने दिलासाच मिळणार असून 600 चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामांना दंड माफ करण्यात आला आहे. 

महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या दुपटीइतकी शास्ती निश्चिती करण्यात आली होती. मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये रहात असले तरी अशा बांधकामात सहभाग नसणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कर हा दंडात्मक शास्तीसह भरावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका अधिनियम 152 ए तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 267 ए या दोन्हींमध्ये सन 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.