Fri, May 29, 2020 00:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ६० लाखांचे एमडी ड्रग्ज जोगेश्‍वरीतून जप्त

६० लाखांचे एमडी ड्रग्ज जोगेश्‍वरीतून जप्त

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला रविवारी आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने एमडी ड्रग्जचासर्वांत मोठा जप्त केला आहे. याप्रकरणी अहमद हुसैन अब्बास हुसैन, आसिफ मुस्तफा कुरेशी या दोन आरोपींना जोगेश्‍वरी येथून पोलिसांनी अटक केली आहे.

या दोघांकडून तीन किलो वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे. हा आतापर्यंत पकडला गेलेला सर्वात मोठा साठा असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांनी सांगितले.