Sat, Aug 24, 2019 22:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुर्धर आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्याची पोलिसांनी केली स्वप्नपूर्ती

दुर्धर आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्याची पोलिसांनी केली स्वप्नपूर्ती

Published On: Mar 23 2018 11:37AM | Last Updated: Mar 23 2018 11:34AMमुलुंड : प्रतिनिधी

टाटा रुग्णालयात दुर्धर आजाराशी लढा देत असलेल्या बिहार येथील आशिष बबलू मंडल (6) या चिमुकल्याने डॉक्टरांकडे पोलिस बनायची इच्छा व्यक्त केली आणि  पोलिसांनी आशिषला चक्क एक दिवसांचा पोलिस अधिकारी बनवून त्याचे स्वप्न पूर्ण केले. कायदा सुव्यवस्था प्रसंगी कठोरही होणार्‍या मुंबई पोलिसांच्या या हळव्या उपक्रमाचे कौतुक होत आहेत. मुंबई पोलिस आपल्या  रक्षणासाठी तत्पर  तर असतातच. परंतु, कधी - कधी ते अशा प्रकारे सामाजिक भान जपतात की, कौतुक करायला शब्द अपुरे पडावेत. मुलुंड पोलिस ठाण्यात गुरुवारी आशिष मंडल या दुर्धर आजाराने ग्रस्त मुलाची इच्छा पूर्ण  करण्यासाठी एक दिवस त्याला मुलुंड पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक करण्यात आले. 

पोलिसांनी आशिषसोबत केक कापून त्याचे अभिनंदनही  केले. आशिषसारख्या दुर्धर आजारानेसलेल्या असंख्य लहानग्यांची इच्छा पूर्ण करणार्‍या मेक विश फाऊंडेशनच्या  कार्यकर्त्यांनी देखील मुंबई पोलिसांचे  आभार मानले. रोज आजाराने लढणार्‍या आपल्या मुलाच्या अंगावरील खाकी वर्दी आणि समाधान पाहून आशिषच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

आशिष हा मूळचा बिहारच्या कटीहराचा. उपचारासाठी आईवडिलांनी मुंबईचे टाटा रुग्णालय गाठले. पोलिस अधिकारी बनण्याचे आशिषचे स्वप्न. ही इच्छा त्याने डॉक्टरांकडे बोलून दाखवली. मेक विश  फाऊंडेशनच्या मदतीने डॉक्टरांनी मुलुंड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत त्याला बसवले. त्याच्यासाठी पोलीस निरीक्षकाचे  कपडेही शिवून घेतले. हातात बेडी, खेळण्यातील बंदूक घेऊन आशिषने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या खुर्चीवर काही क्षण बसून कामकाज पाहिले. तुरुंग, तक्रारकक्ष, इतर विभागही पाहिले. डॉक्टरांकडे व्यक्त केली पोलीस अधिकारी होण्याची इच्छा; मुलुंड पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.