Wed, Nov 21, 2018 01:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आईच्या हातातून पडून ६ महिन्याच्या चिमुकल्‍याचा मृत्‍यू 

आईच्या हातातून पडून ६ महिन्याच्या चिमुकल्‍याचा मृत्‍यू 

Published On: May 06 2018 9:58PM | Last Updated: May 06 2018 9:58PMकल्याण : वार्ताहर

आईच्या हातातून पडून ६ महिन्याच्या चिमुकत्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना उल्हासनगर येथील धोबीघाट परिसरात घडली आहे. लग्न समारंभातील दुसऱ्या मजल्या वरील हॉलमधून खाली उतरत असताना उंच टाचेच्या हाई हिलच्या सॅन्डलमुळे आईचा तोल गेला आणि तिच्या हातातील बाळ जिन्याच्या मधल्या भागातून खाली पडले, यात बाळाचा जागीच मृत्‍यू झाला.   

उल्हासनगर येथील धोबीघाट परिसरात राहणारे शेख कुटुंब एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील मातोश्री हॉलमध्ये आले होते. रविवारी दुपारी लग्न संपल्यानंतर शेख कुटुंब जेवण अटपून  घरी जात असताना कुटुंबातील महिला फेमिदा शेख आपल्या ६ महिन्याच्या बाळाला घेऊन दुसऱ्या मजल्यावरून  जिना उतरत होत्‍या. जिना उतरत असताना अचानक त्‍यांच्या पायातील उंच टाचेच्या हाई हिलच्या सॅन्डलमुळे त्‍यांचा तोल गेला आणि हातातील बाळ खाली पडले. त्‍यामुळे गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी  त्‍याला मृत घोषित केले.   

Tags : mumbai kalyan, boy