Tue, Apr 23, 2019 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५७१ पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह

५७१ पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 571 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहेत. येत्या 1 मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर होणार्‍या समारंभावेळी ही पदके प्रदान करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी दिले.

यवतमाळचे पोलीस अधीक्षक एम. राजकूमार यांच्यासह सांगलीचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन माने, वाशिमचे सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे आणि प्रफुल्ल कदम, अहमदनगरचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक सुनील रोमन, गडचिरोलीचे पोलीस नाईक जितेंद्र मारगये आणि पोलीस शिपाई गजेंद्र सौजल यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना पदके जाहीर करण्यात आली आहेत.

गडचिरोलीमधील माओवाद्यांचा मोठ्याप्रमाणात खात्मा करणार्‍या गडचिरोली पोलीस जवानांच्या पथकाचे प्रमुख असलेले गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना  दरोडेखोर आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांविरोधात कारवाई केल्याबद्दल या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. देशमुख यांच्यासह नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, बीडचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, मुंबई शहरचे पोलीस उपनिरीक्षक विनायक पेडणेकर आणि सतीश खोत, मुंबईचे पोलीस शिपाई राजेंद्र सोनावणे यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना पदके देण्यात येणार आहेत.

गुणवत्तपूर्ण सेवेबद्दल नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळचे प्राचार्य सोमनाथ घार्गे यांना, तर पोलीस दलाच्या सेवेमध्ये सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेखाबद्दल पालघरचे पोलीस उपअधिक्षक फत्तेसिंह पाटील यांच्यासह जालन्याचे उपअधीक्षक सोपान बांगर, मुंबईचे पोलीस निरीक्षक उदय राणे, नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक किशन गायकवाड, ठाणे शहरचे पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परब, कोल्हापूरचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक विजय कदम, सुनील सोनावणे, विलास पेंडुरकर, शिवाजी देसाई यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना गौरविण्यात येणार आहे. 

पोलीस पदकधारक म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या दक्षता मासिकाचे मुख्य संपादक सहायक पोलीस उपमहानिरीक्षक यशवंत व्हटकर, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन आणि दत्तात्रय पाटील, मुंबईचे पोलीस निरीक्षक सुधीर कालेकर, तर विशेष शाखेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल गुन्हे अन्वेशण पुणे येथील पोलीस निरीक्षक सुभाष निकम आणि सहायक पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, फोर्सवन मुंबईचे पोलीस नाईक दत्तू शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना सन्मानित करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर खेळात प्रावीण्य मिळविल्याबद्दल कोल्हापूरच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक जयश्री बोरगी, जळगावचे पोलीस नाईक सचिन चौधरी, मुंबईच्या महिला पोलीस शिपाई वर्षा भवारी आणि साईगिता नाईक यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना, तर प्रशंसनीय स्वरुपाचे अन्य दृष्य व अत्युतम काम केल्याबद्दल मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि संजय निकम, राज्य गुप्तवार्ता विभाग गडचिरोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जाधव, बिनतारी संदेश विभाग पुणेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय महिंद्रकर, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई हृदयनारायण मिश्रा, राज्य गुप्तवार्ता विभाग गडचिरोलीचे पोलीस शिपाई मधुकर आचेवार, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे पोलीस शिपाई अख्तर शेख यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना गौरविण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चोरट, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप देवकर, मुंबईचे पोलीस शिपाई सुर्दशन शिंदे, तेजेश सोनावणे आणि सुशांत जाधव यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना, तर विनाअपघात 20 वर्षे उत्तम सेवाभिलेखाबद्दल सोलापूर शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुलकर्णी, मल्लप्पा कोणदे आणि महादेव सावंत, पुणे शहरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, सिंधुदुर्गचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना, तर जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळ केल्याबद्दल नागपूर शहरचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने, मुंबईच्या महिला पोलीस शिपाई किरण कोठुळे, मुंबईचे पोलीस नाईक संजय नांगरे यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदारांना सन्मानित करण्यात येणार आहे.