Tue, Mar 26, 2019 22:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई श्री स्पर्धेसाठी ५४ खेळाडू पात्र

मुंबई श्री स्पर्धेसाठी ५४ खेळाडू पात्र

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 1:25AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी 

अत्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबईकरांना आपल्या शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती पाहण्याचे भाग्य लाभले. नऊ गटांमध्ये झालेल्या चाचणीत मुंबईतील एकापेक्षा सरस शरीरसौष्ठवपटू मंचावर अवतरल्यामुळे कुणाची अंतिम फेरीसाठी निवड करायची, असा पेचप्रसंग परीक्षकांना पडला होता. आता कांदिवली पूर्वेला ठाकूर संकुलातील सेंट लॉरेन्स शाळेच्या पटांगणात रंगणार्‍या अंतिम फेरीत मुंबई श्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेले चार महिने मुंबईचे युवा शरीरसौष्ठवपटू मुंबई श्री स्पर्धेच्या किताबासाठी तासनतास घाम गाळत असल्यामुळे प्राथमिक फेरीत पीळदार शरीरयष्टीचे द्वंद्व पाहायला मिळाले. 154 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभल्यामुळे प्राथमिक फेरीत प्रत्येक गटात चुरस पाहायला मिळाली. तब्बल 54 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना रविवारी थरारक खेळाची अनुभूती घेता येईल. 55 किलो वजनी गटात संदेश सकपाळ, नितीन शिगवण, किशोर कदम, वैभव गुरव आणि राजेश तारवे यांच्यात गटविजेतेपदासाठी कडवी लढत रंगेल. 

सुनीत, सागरचा खेळ पाहण्याची संधी

मुंबई श्री स्पर्धेनंतर लगेचच पुढच्या रविवारी महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबईचा संघ निवडण्याकरिता मुंबईतील सुनीत जाधव,सागर कातुर्डे, रोहित शेट्टी, सचिन डोंगरे, अतुल आंब्रे आणि रोहन धुरी हे दिग्गज क्रिकेटपटू आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई श्री स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत नसले तरी त्यांचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.