Fri, Apr 26, 2019 03:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५१८ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

५१८ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलामध्ये बदल्यांचे सत्र सुरू असून तब्बल 518 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश बुधवारी पोलीस मुख्यालयाने काढले. तर 79 सहायक पोलीस निरीक्षकांना त्याच जागी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 24 पोलीस निरीक्षकांच्याही प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. 

राज्य दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक दिपक बोबाटे, शत्रुघ्न आगवणे, श्रीकांत नेवे, सदाशीव नागरे आणि यतीन संकपाळ यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभाग आणि लोहमार्ग पुणे येथील प्रत्येकी 10, विशेष सुरक्षा विभाग मुंबईतील 7 आणि अन्य विभाग, आयुक्तालये अशा एकूण 71 अधिकार्‍यांच्या त्यांचा नियुक्तीच्या ठिकाणचा कार्यकाल पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या.

ठाणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक प्रताप पवार, श्रद्धा देशमुख यांच्यासह 50 अधिकारी, तर मुंबई पोलीस दलातील नवनाथ घुगे आणि शिवराज म्हेत्रे, नवी मुंबई पोलीस दलातील राजेशकुमार थोरात यांच्यासह 27 अधिकारी, नागपूर शहर पोलीस दलातील प्रभाकर शिऊरकर यांच्यासह 40 अधिकारी, पुणे शहर पोलीस दलातील गितांजली बाबर, रविंद्र बाबत यांच्यासह 39 अधिकारी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील 30 अशा राज्यभरातील एकूण 361 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबई पोलीस दलातील तेजश्री पाचपूते, ज्योती हिवरे, राजेश जाधव, लक्ष्मण उर्कीडे, विजय शिंदे, नागेश यमगर, भूषण आडके यांच्यासह राज्यभरातील 86 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांची मुंबई शहरला झालेली बदली रद्द करुन त्यांना त्याच जागी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर या बदल्यांमुळे मुंबईला युवराज दळवी, सचिन पाटील, पद्मजा माने, जितेंद्र कोळी, रविंद्र मोहीते, प्रभाकर जोशी, उदय साळवी आणि संगम गुरसळे हे अधिकारी मिळाले आहेत.

ठाणे शहर पोलीस दलातील अब्दुल तडवी, नवी मुंबई पोलीस दलातील चंद्रशेखर भोईर आणि नामदेव खांदारे यांच्यासह पुणे शहर पोलीस दलातील 3, राज्य गुन्हे विभागातील 17, विशेष सुरक्षा विभागातील 16, गुन्हे अन्वेषण विभागातील 9, फोर्सवनमधील 7 अशा एकूण 79 अधिकार्‍यांना नियुक्तीच्या ठिकाणीच एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.