Wed, Jan 23, 2019 12:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत बसवणार ५०० प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिन्स!

मुंबईत बसवणार ५०० प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिन्स!

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 1:08AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्लास्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे लवकरच शहरात 500 पेक्षा जास्त प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिन बसवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने 23 मार्च रोजी एका अधिसूचनेद्वारे राज्यात प्लास्टिकबंदी जाहीर केली आहे. 

मुंबई शहरात रोज 30 लाखांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्यांचे वितरण केले जाते. महापालिकेला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीमार्फत मोफत मिळणार्‍या या मशिन्स पर्यटन ठिकाणे, बागा, बाजारपेठा तसेच जादा मानवी वर्दळ असणार्‍या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. सदर मशिन कुठे बसवायच्या याबाबत माहिती देण्यासाठी सर्व वॉर्डांना सूचना देण्यात आल्या आहेत.  फोर्ट, नरिमन पॉईंट, कुलाबा यांचा समावेश असलेल्या ए वॉर्डमधील सार्वजनिक ठिकाणी इतर वॉर्डांच्या तुलनेत सर्वात जास्त वर्दळ असल्याने या वॉर्डात जादा मशिन बसवण्यात येणार आहेत. याशिवाय गेट वे ऑफ इंडिया व मरिन ड्राईव्ह यासारख्या ठिकाणांचाही यादीत समावेश करण्यात येणार आहे. 

प्रात्यक्षिकासाठी सदर मशिन प्रथम महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात बसवण्यात येणार आहे.

Tags : Mumbai, 500 plastic bottle, crushing machine, set, Mumbai news,